Ashtavinayak Darshan, Alandi, Jejuri
Description
अष्टविनायकाची
तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन
पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक
स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती
तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत.
या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही
एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता
सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या
प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले
जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी,
गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक,
बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची
वेगवेगळी नांवे आहेत.
| Dates | Single Per Seat | Twin Sharing Per Seat | 3/4 Sharing Per Seat |
|---|
Itinerary
Our Brief Daily Program